काँग्रेसने (Congress) गुरुवारी आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Asembly Election 2023 ) 42 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. कॉंग्रसच्या या यादीमध्ये पक्षाने राज्यातील निवडणुकीपूर्वीच भाजप (BJP) आणि जेडीएस (JDS ) मधून उडी मारलेल्या काही ईच्छुकांना उमेदवारी देण्यात आली आहे. 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने काही नवीन चेहरेही मैदानात उतरवले आहेत. मल्लिकार्जुन खरगे ( Mallikarjun Kharge ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीत उमेदवार निश्चित करण्यात आले. गेल्याच महिन्यात पक्षाने आपल्या पहिल्या यादीत 124 उमेदवारांची घोषणा केली होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पराभव पत्कारावा लागला होता. खर्गे यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाबूराव चिंचनसूर यांना कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील गुरुमितकल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नुकताच भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसवासी झालेले बाबूराव चिंचनसूर पाच वेळा आमदार राहीलेले आहेत.
भाजपचे आणखी एका माजी आमदार एन वाय गोपालकृष्ण, यांनी आपल्या आमदारकिचा राजिनामा देऊन कॉंग्रेसमदध्य़े प्रवेश केला. चित्रदुगा जिल्ह्यातील मोलाकलमुरू या अनुसुचित जमातीसाठी राखिव असलेल्या या मतदारसंघातून त्यांनी प्रतिनिधित्व केले. गोपालकृष्ण 2018 मध्ये बल्लारी जिल्ह्यातील कुडलिगी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले असले तरी ते आता मोलाकलमुरू येथून कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवतील.
याचबरोबर JD(S) सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या YSV दत्ता यांना कदूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात येऊन कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचे विश्वासू आनंद केएस यांना कदूरचे तिकीट देण्यात आले आहे.
तसेच धारवाड य़ा विधानसभा मतदारसंघातून विनय कुलकर्णी हे निवडणूक लढवणार आहेत. माजी मुख्यमंत्री धरम सिंह यांचे पुत्र माजी आमदार विजय धरम सिंह बसवकल्याण मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार राहीतील. मेलुकोट मतदारसंघात सर्वोदय कर्नाटक पक्षाला कॉंग्रेस पाठिंबा देण्याच्या तयारित असून शेतकरी नेते के.एस. पुट्टनय्या यांचे पुत्र दर्शन पुट्टनैय्या हे इथून उमेदवार असतील.