खानापूर मतदारसंघ भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि. २५ रोजी खानापुरात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भव्य रोड शो केला.
मागच्यावेळी कर्नाटक राज्यात सत्ता गाजवलेला भाजप यंदा पुन्हा सत्ताधारी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. राज्यभरात भाजपच्यावतीने जयवाहिनी दिग्विजय यात्रेच्या द्वारे मतदारांना वोट अपील करण्यात येत आहे.मंगळवारी खानापुर शहरात भाजपचे अधिकृत उमेदवार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली भव्य रोड शो पार पडला.
याप्रसंगी भाजपचे जनहित योजनांची माहिती देत पुन्हा भाजपाला पाठिंबा दर्शवून, भाजपच्या उमेदवाराला बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला.यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. जनतेतून भाजपच्या या प्रचाराला चांगला प्रतिसाद लाभत आहे.