खानापूर – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आश्रय कॉलनीत रात्री १२ च्या सुमारास, मारुती गणराज जाधव (वय 42) याचा त्याच्या शेजारी राहणाऱ्या प्रशांत दत्ता नार्वेकर याने भीषण खून केला आहे. मारुती हा रात्री जेवण केल्यानंतर आपल्या घरासमोर फिरत होता प्रशांत याने अचानक येऊन धारदार चाकूने पोटात ४ वेळा वार केले नंतर पुन्हा मानेवर सपासप वार करून ठार केले त्यानंतर त्याने आपल्यावर हल्ला केल्याचे भासवण्यासाठी त्याच्या हातात आपल्या घरातील कुऱ्हाड व तलवार ठेवली व स्वतः तिथेच बसून राहिला होता. त्यानंतर पोलिसांचे पाचारण करण्यात आले पोलिसांनी प्रशांत याला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. रात्री 2.00 वाजता डी वाय एस पी कटगी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बेळगावला उत्तरीय तपासासाठी पाठवण्यात आला. हा खुन अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Previous Articleझुलता पूल कोसळून १४० ठार
Next Article पीटीएम कोल्हापूरकडे साईराज फुटबॉल चषक
Related Posts
Add A Comment