नवी दिल्ली
दक्षिण कोरियन कार निर्मिती करणारी कंपनी किया (Kia) यांनी भारतामध्ये आपली नवीन कार सोनेट एक्स-लाईन (Sonet X Line) बाजारात सादर केली आहे. किया सोनेट एक्स लाईन एसयूव्ही कियाच्या जीटीएक्ससह मॉडेलवर आधारीत अपडेट व्हर्जन आहे. काही सौंदर्यवर्धक बदलांसोबत येणार आहे. किया सोनेट एक्स-लाईनची 1.0 लिटर टर्ब्रो पेट्रोलची सुरुवातीची एक्स शोरुम किमत ही 13.39 लाख रुपये आहे. 1.5 लिटर टर्बो डिझेल मॉडेलची एक्सशोरुमची किमत 13.99 लाख राहणार आहे.
अन्य फिचर्स ः
भारतात सब 4 मीटर एसयूव्हीचे प्रथमच सादरीकरण
1.0 ते 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिनसोबत सादरीकरण
बॉक्समध्ये 7 स्पीड डबल क्लच ऑटोमेटिक ट्रान्समिशन