प्रतीक बाळेकुंद्री सामनावीर, सुशांत कोवाडकर मालिकावीरासह सायकला मानकरी
बेळगाव : य् ाsळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी स्पोर्ट्स क्लब आयोजित किरण जाधवचषक ग्रामीण क्रिकेट स्पर्धाया अंतिम सामन्यात निल इंडियन बॉईज हिंडलगा संघाने एकदंत स्पोर्ट्स कणबर्गी संघाचा 5 गडय़ांनी पराभव करून किरण जाधव चषक पटकाविला. प्रतीक बाळेकुंद्री सामनावीर तर सुशांत कोवाडकरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. श्र् ााr चांगळेश्वरी हायस्कूल मैदानावर या स्पर्धेत एकूण 38 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात एकदंत स्पोर्ट्स क्लब कणबर्गी संघाने 10 षटकात 5 बाद 60 धावा केल्या. गजाननने 13, बसु व सुनीलने प्रत्येकी 10 धावा केल्या. निल बॉईज हिंडलगातर्फे शंकरने 2, पवन, तनिष्क व सुशांत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना निल बॉईज संघाने 8.3 षटकात 5 बाद 61 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. प्रतीक बाळेकुंद्रीने 3 षटकारासह 29, सुशांत व अमोल यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. एकदंततर्फे संतोष जी. ने 2, सुनील जी. व सुनील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कर्ते किरण जाधव उपस्थित होते. यावेळी विजेत्या व उपविजेत्या संघाला मान्यवरांया हस्ते ााषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर प्रतीक बाळेकुंद्री (निल इंडियन बॉईज), स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अमित (एकदंत स्पोर्ट्स) व उत्कृष्ट गोलंदाज हरीश पाटील (श्री चांगळेश्र्वरी स्पोर्ट्स) यांना ााषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर सुशांत कोवाडकरला (निल इंडियन बॉईज) स्पोर्ट्स सायकल बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष सतीश बा. पाटील, श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे सचिव प्रसाद मजुकर, प्रतीक मुगळीकर, विशाल टक्केकर, ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, राकेश परीट, दयानंद उघाडे, राजू डोण्याण्णावर, कृष्णा बिजगरकर, हेमंत पाटील, जोतिबा नंदिहळ्ळी, नामदेव कदम, परशराम कणबरकर, उत्तम मंगणाकर आदी उपस्थित होते. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून प्रकाश करलेकर व प्रकाश पाटील तर स्कोअरर म्हणून ऋतुराज हलगेकर यांनी काम पाहिले व समालोचक म्हणून बाबू पिंगट यांनी काम पाहिले.