भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नवघर पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांना ५० लाख रुपयांची मागणी करणारा धमकीचा ईमेल आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ईमेलमध्ये सोमय्या यांना त्यांचे अजूनही आक्षेपार्ह व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावा करून ते व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे. नवघर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
काही दिवसापुर्वी भाजपचे नेते किरिट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा झाल्या. हे व्हिडियो दाखवणाऱ्या लोकशाही या चॅनेलविरुद्ध कारवाई करून त्यांच्यावर दोन दिवसाच्या प्रेक्षपणावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांना आलेल्या नव्या ईमेल मुळे पुन्हा किरीट सोमय्या चर्चेमध्ये आले आहेत.
पोलिसांनी या घटनेची माहीती देताना, “सोमय्या यांनी दिलेल्या माहीतीनसुसार, 2017 पासून ते विविध विभाग आणि संस्थांमधील भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या अनेक बाबींवर प्रकाश टाकत आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते आणि त्यांचे सहकारी यांनी माझ्यावर राग काढला आहे. त्यामुळेच आपल्याला सातत्याने धमकीचे मेसेज आणि मेल येत आहेत.” असा आरोप त्यांनी केला.
अधिक माहीती देताना किरिट सोमय्या यांनी दावा केला करताना त्यांच्या कार्यालयातील एक कर्मचारी त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर ईमेल तपासत असताना तिला धमकीचा मेल आढळला.
यामध्ये “तुमचे विनाकपड्यांमधील स्पष्ट व्हिडिओ माझ्याकडे आहेत.” तसेच “मागील व्हायरल झालेले व्हीडीओ हा फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर अजून बाकी आहे. हा पिक्चर व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी 50 लाख जमा करा किंवा पुन्हा एकदा प्रसिद्ध होण्यासाठी तयार रहा.” अशी धमकी देण्यात आली आहे.