प्रतिनिधी /पणजी
इब्रामपूर येथील सातेरी मंदीरात नवरात्रोत्सवा निमित्त इब्रामपूर येथील युवा किर्तनकार विष्णू गवस यांचे आज मंगळवार 27 रोजी रात्री 9.30 वाजता किर्तन होणार आहे. त्यांना हर्मोनिअमवर मकरंद परब तर तबल्यावर महादेव खेडेकर साथ करणार आहेत.
भजन तसेच संगीत नाटय़ कलेत चांगल्यापैकी नावलौकिक मिळविलेल्या विष्णू गवस यांनी किर्तन क्षेत्रातही आपला चांगला जम बसविला आहे. भजनात तेसच नाटय़संगीत स्पर्धेतून त्यांनी अनेक पारितोषीके मिळविली आहेत. त्यांनी किर्तनाचे धडे बोरी फोंडा येथील राष्ट्रीय किर्तनकार प्रचार्य सुहासबुवा वझे यांच्याकडे घेतले आहेत. गोव्यात तसेच महाराष्ट्राच्या सिधुदुर्ग जिह्यात त्यांनी अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम केले आहेत.
नवरात्रोत्सवात 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणी त्यांचे किर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. बुधवार 28 रोजी वसदेव मंदिर नागझर पेडणे, गुरुवार 29 रोजी सातेरी कृष्ण पंच पांडव मंदिर उसकई म्हापसा, शुक्रवार 30 रोजी नवदुर्गा मंडप सासोरी (सिंधुदुर्ग महाराष्ट्र), शनिवार 1 ऑक्टोबर रोजी सातेरी काळखडपेश्वर मंदीर कामुर्ली म्हापसा, रविवार 2 ऑक्टोबर रोजी शंतादुर्गा मंदीर सर्वण डिचोली, सोमवार 3 ऑक्टोबर रोजी कुंभारजुवेकरीण मंदीर माशेल फोंडा तर मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी सातेरी मंदीर कोलझर (सिंधुदुर्ग महाराष्ट्र) येथे त्यांचे किर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.