बेळगाव : केएलई कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुनील जलालपुरे यांना ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) चा राष्ट्रीय तांत्रिक शिक्षण पुरस्कार देण्यात आला. नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. तत्पूर्वी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.
अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंग व डॉ. एन. जगदीशकुमार यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला. प्रा. जलालपुरे हे 24 वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात आहेत. औषधी वनस्पतींपासून औषधांचा शोध व विकास, हर्बल ऍक्टिव्हची नॅनो पार्टीकल ड्रग डिलीव्हरी सिस्टीम व ग्रीन नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्रात त्यांचे संशोधन आहे. संशोधनासाठी त्यांना अनेक संस्थांकडून 1 कोटीपर्यंत अर्थसाहाय्य मिळाले आहे. त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 48 विद्यार्थी एम. फार्मा तर 18 विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे.