राष्ट्रीय क्रमवारीत 74 वा क्रमांक : देशातील टॉप 100 विद्यापीठांमध्ये सलग सातव्यांदा समावेश
प्रतिनिधी/कोल्हापूर
शिक्षण मंत्रालय भारत सरकारमार्फत देशात राबविण्यात आलेल्या “ नॅशनल इन्स्टिटय़ुशनल रैंकिंग फेमवर्क (एनआयआरएफ) 2022 च्या क्रमवारीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीने राष्ट्रीय स्तरावर 74 वे स्थान मिळविले. राष्ट्रीय क्रमवारीच्या यादीत सलग सातव्यांदा स्थान पटकाविलेले शिवाजी विद्यापीठ संलग्नित एकमेव महाविद्यालय आहे. भारती विद्यापीठाच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ’नॅशनल इन्स्टिटयुशनल रॅकिंग फेमवक (एनआयआरएफ) 2022 तर्फे देशातल्या ’ टॉप 100 विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थाची क्रमवारी गुरूवारी जाहीर झाली. या यादीत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीने उल्लेखनीय यश संपादन केले. राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीमध्ये सुसुत्रता येण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महाविद्यालयाचे मूल्यांकन सुरू केले आहे. अद्यापन-अद्ययन प्रक्रिया संशोधन व व्यवसायिक कृतीशिलता, नोकरी व व्यवसाय प्रमाण, विद्यार्थ्याचे उत्तीर्णतेचे प्रमाण समाजातील वंचित घटकापर्यंत शिक्षण पोहचविण्याचे प्रयत्न, महाविद्यालयाचे जनमानसातील प्रतिमा आदि निकषांवर ही क्रमवारी आधारीत आहे.
1996 मध्ये स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगरावजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन व सामाजिक क्षेत्रात कार्य सुरू आहे. पुणे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, तसेच पालक, विद्यार्थी व उद्योजक सर्वांच्या पाठबळामुळे हे यश मिळाले आहे. या रॅकींगसाठी निकषामध्ये महाविद्यालयाची कामगिरी समाधानकारक आहे.सामाजिक बांधीलकी म्हणून महाविद्यालया मार्फत रक्त तपासणी, रक्तदान, मधुमेह, महिलांचे व वृध्दांचे आरोग्य, लेक वाचवा अभियान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, औषधांच्या योग्य वापराविषयी मार्गदर्शन असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या यशाबद्दल महाविद्यालय प्रशासनाने अभिनंदन केले.
सर्वांच्या सहकार्यामुळे यश
विशेषता संशोधन व प्रकाशन तसेच प्लेसमेंट यामध्ये कार्य उल्लेखनीय आहे. अल्पावधीतच महाविद्यालयाने शैक्षणिक, कला, किडा व सांस्कृतीक क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा ऊमटवला आहे. महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाचे निरंतर संलग्निकरण मिळालेले आहे. नवी दिल्ली येथील ’नॅशनल बोर्ड ऑफ ऍकिडिटेशनचे दुसऱयांदा मानांकन मिळालेले शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. महाविद्यालयाची नोंदणी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या 12 (ब) 2 (फ) या यादीत समाविष्ट झाल्याने आजपर्यंत महाविद्यालयास एक कोटी रूपयेचा संशोधन निधी मिळालेला आहे. 700 हून अधिक पेपर प्रज्सध्द झाले. तर 32 हून अधिक पेटंट मिळालेले आहेत.
प्राचार्य डॉ. एच. एम. मोरे (भारती विद्यापीठ)