सरकारी विभागास क्रिडा साहित्य पुरवठा केलेले बिल काढून देण्यासाठी ठेकेदाराकडून 1 लाख 10 हजाराची लाच स्विकारताना कोल्हापूरचे क्रिडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे राहणार विश्रामबाग सांगली यांना अटक केली आहे. तक्रारदाराकडून लाच घेताना जिल्हा क्रिडा अधिकारी रंगेहाथ लाचलुचपतच्या जाळ्यात आस्याने पोलीसांनीही कारवाई केली आहे.
पोलीसांनी अधिक दिलेल्या माहीतीनुसार, तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी ‘ऑनलाईन महाटेंडर’ वरती कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य वेबसाईटवर आलेल्या जाहिरातीनुसार पुरवले होते.
ठेकेदाराने पुरवलेल्या साहित्याचे एकूण बिल हे 8, 89, 200/- रुपयांचे झाले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी आल्यानंतर क्रिडा अधिकारी साखरे यांनी ठेकेदाराकडे वरील बिल रकमेच्या अंदाजे 15 टक्के प्रमाणे लाच मागणी केली. शेवटी तडजोडीअंती 1,10,000 रूपयांवर समझोता झाला. त्यानंतर लाचेची रक्कम आरोपी यांनी तक्रारदारांकडून स्वतः स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी साखरे यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून यामध्ये बापू साळूंखे, संजीव बंबरगेकर, श्रेणी पोसई यांनीही भाग घेतला.