शिरोळ/प्रतिनिधी
रेल्वेमध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणीतील दोघा संशयित आरोपींना शिरोळ पोलीसांनी अटक केली. सय्यद नूरमहमंद शेख ( वय ३२, रा.सांडगेवाडी, ता. पलूस, जि.सांगली ) व शाहीन मुल्लाणी( रा. पुंदी, ता. पलूस) अशी संशयित आरोपींची नांवे असून जयसिंगपूर न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
तर मौलाली मुल्ला ( रा.नागठाणे, ता. वाळवा) या तिसऱ्या संशयिताचा शोध सुरु आहे. याबाबत सुरज शंकर मोरे ( वय २६ , रा.गावडे गल्ली नदीवेस) याने पोलीसांत फिर्याद दिली होती. संशयितांनी दहा लाख पन्नास हजार रूपयाची फसवणूक केली आहे. यांनी तरुणाला रेल्वेमध्ये नोकरीचे अमिष दाखवले होते.
हे ही वाचा : सातारा येथील व्यावसायिकाची २६.४३ लाखांची फसवणूक