कोल्हापूर जिल्हा व सांगली महानगरपालिका ठरले विजेते
वेंगुर्ले (वार्ताहर)-
कोल्हापूर विभागीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पाट येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील स्पर्धेत मुलांच्या गटातून कोल्हापूर जिल्हा तर मुलींच्या गटातून सांगली महानगरपालिका विजेते ठरले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित कोल्हापूर विभागीय 19 वर्षाखालील शालेय व्हाॅलीबॉल स्पर्धा एस.एल. देसाई विद्यालय पाट हायस्कूलच्या मैदानावर 27 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाली असून या स्पर्धेमध्ये मुलगे व मुली गटातून कोल्हापूर ,सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे संघ सहभागी झाले होते.
या व्हाॅलीबॉल स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्रालयाचे आणि मराठी भाषा मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट, पंचक्रोशी पाटचे उपाध्यक्ष श्री.डी.ए.सामंत यांच्या हस्ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक केसरकर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, संस्था पदाधिकारी देवदत्त साळगांवकर, राजेश सामंत, प्रशालेचे मुख्याध्यापक श्यामराव कोरे, पर्यवेक्षक श्री. हंजनकर, माड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रावण, सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी जमीर अत्तार, कोल्हापूर व्हाॅलीबॉल प्रमुख संदीप पाटील, महसूल सेवेत कार्यरत असलेले प्रशालेचे माजी विद्यार्थी रवींद्र भालचंद्र चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संघ अध्यक्ष अजय शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, राष्ट्रीय खेळाडू अतुल सावडावकर, राघोजी परब, प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
19 वर्षाखालील मुलगे व मुली त्यांचे रोमहर्षक सामने क्रीडा रसिकांना पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक, सांगली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक, कोल्हापूर महानगरपालिकेने तृतीय तर सातारा जिल्ह्याने चतुर्थ क्रमांक मिळवला. मुलींच्या गटांमध्ये सांगली महानगरपालिकेने प्रथम तर सांगली जिल्ह्याने द्वितीय क्रमांक व रत्नागिरी जिल्हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तर सातारा जिल्ह्याने चतुर्थ क्रमांक पटकावला.या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजय शिंदे,अमित हर्डीकर, अजित जगदाळे, हरेश वाघाटे, नेव्हील गोन्सालविस, महेश शेडबाळे,सुरज पवार, श्रीकांत पाटील, ईर्शाद शेख राजेश गोवेकर, सुशांत खोत, श्रीनाथ फणसेकर, अतुल सावडावकर, जमीर अत्तार, आसिफ मुल्ला यांनी काम पाहिले.या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी श्री.साळसकर सर यांनी केले. तीन दिवस चाललेल्या या कोल्हापूर विभागीय व्हाॅलीबॉल स्पर्धा पाट हायस्कूलच्या मैदानावर थाटामाटात संपन्न झाल्या.