गोकुळ शिरगाव वार्ताहर
गणेश उत्सव काळात कायदा सुव्यस्ता प्रश्न निर्माण करणाऱ्या सराईत नऊ गुंडावर गोकुळ शिरगाव पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील नऊ सराईतावर कारवाईचा प्रस्ताव गोकुळ शिरगाव पोलिसांनी तयार केला. गणेशोत्सव कालावधीमध्ये कोल्हापूर शहराचे व करवीर तालुक्याचे हद्दीत प्रवेश करू नये अशा नोटीसा गोकुळ शिरगाव पोलिसांनी सराईतांना पाठविल्या आहेत.
अक्षय विष्णू साळुंखे ,अमित विष्णू साळुंखे, रा. गोकुळ शिरगाव, राजू ज्ञानदेव पाटील ,शहाजी ज्ञानदेव पाटील रा. कंदलगाव, महेश सुरेश गुमाने, विष्णू सुरेश गुमाने, करण शार्गीद तमायचे ,रोहन तमाईचे, आकाश किशोर गावडे रा. उजळाईवाडी अशी कारवाई झालेल्या सरायतांची नावे आहेत. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे.