जेसीबी दुरूस्तचा प्रस्ताव चार महिन्यानंतर मंजूर; आठ पैकी चार जेसाबीमध्ये बिघाड, नाले सफाई कशी होणार?
कृती समितीचा वर्कशॉपमध्ये जाऊन भांडाफोड; चालक, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त, वाहनांच्या पासिंगकडे दुर्लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
कृती समितीने मंगळवारी महापालिकेच्या वकॅशॉपमध्ये अचानक भेट देवून अनागोंदी कारभाराचा भांडफोड केला. येथील आठपैकी चार जेसीबी बंद असून त्यांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तब्बल चार महिन्यानंतर मंजूर करण्यात आला आहे. जेसीबी वेळवर दुरूस्ती झाले नसल्याने नाले सफाईवर परिणाम झाल्याचा आरोपही त्यांनी केला. चालक, कर्मचाऱयांचे पदे रिक्त, वाहनांच्या पासिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचेही समोर आले.
कृती समितीकडून गेल्या पाच दिवसांपासून शहरातील नाल्यांची पाहणी सुरू आहे. मंगळवारी शेळके पुलाचा नाला व दुसरा कोटीतीर्थ मार्केट समोरील नाल्याची पाहणी केली. येथील नाले सफाई झाली नसल्याचे समोर गेले. त्याचबरोबर नाले पाहणी करताना दरवेळी जेसीबी नसल्यामुळे नाले सफाई होत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. यामुळे कृती समितीने महापालिकेचे थेट वर्कशॉप गाटले. यावेळी महापालिकेचे एकूण 8 जेसीबीपैकी दोन जेसीबी इंजिन कामासाठी गेली अडीच वर्ष बंद आहेत. तर दोन मशिन टायरसाठी बंद ठेवले आहेत. विशेष म्हणजे 17 फेब्रुवारीला या जेसीबींच्या कामासाठी 1 लाख 23 हजारांचा निधी मिळण्यासाठी मनपा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. तो चार महिन्याने म्हणजे 9 जुनला मंजूर केल्याचे कृती समितीच्या पाहणीवेळी समोर आले. महापालिकेला निर्णयच करायचा नाही हे यातून स्पष्ट होते. उर्वरीत 4 जेसीबी मशिनपैकी एकही मशिन नालेसफाईच्या कामासाठी वापरले जात नसल्याचेही निदर्शनास आले.
65 अवजड वाहने पासिंग शिवाय रस्त्यावर
वर्कशॉपमध्ये 157 वाहने असून 70 डंपर, अग्निशमन कॉम्प्कॉ्टर, मैला वाहतूक प्रकारची आहेत. त्यातील 65 वाहनांचे पासिंग झालेले नसताना वापरली जात आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार महापालिकेकडून सुरू आहे.
रखवालदाराकडून मेकॅनिकलचे काम
मनपाकडे यापूर्वी 75 वाहनांसाठी 150 कर्मचारी कार्यरत होते. तर आता 150 वाहनांसाठी केवळ 45 कर्मचारी आहेत. हेड मेकॅनिक एकही नाही. वेळ प्रसंगी परिसरातील रखवालदाराकडून मेकॅनिकचे काम करावे लागत असल्याचा प्रकार कृती समितीच्या निदर्शनास आला.