कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. शनिवारी १६ तारखेला राजाराम तलाव परिसरातील शासकिय गोदाम येथे मतमोजणी होणार आहे. 15 टेबलवर ही मतमोजणी होणार असून 26 फेऱ्यानंतर निकाल जाहीर होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेकडून तयारी करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सकाळी आठ वाजता पहिल्यांदा एका टेबलवर पोस्टल मतमोजणी केली जाणार आहे. याबरोबरच एकावेळी 14 टेबलवर ईव्हीएममधील मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या केंद्रापासून ही मतमोजणी होणार आहे. दरम्यान 5 टक्के व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठयांचीही मोजणी केली जाणार आहे. पहिल्या केंद्रापासून मतमोजणीच्या 26 फेऱ्या होणार असून दुपारपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणेने तयारी केली आहे.