पुलाची शिरोली/ वार्ताहर
पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नागांव फाटा येथे भरधाव ट्रेलरची मोटरसायकलला पाठीमागुन जोराची धडक बसून मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला तर एक जखमी झाला. हे दोघे सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. अपघातातील मयताचे नाव हर्षद सुनिल बुद्रुक ( वय १९ ) तर जखमीचे नाव सुजल रामचंद्र बागणे ( वय १९) असे आहे.
याबाबत अधिक शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हे मोटरसायकल स्वार आपल्या मोटरसायकल वरून कामानिमित्त हर्षद बुद्रुक याच्या इंगळी येथील मामाच्या गावी जात होते . ते नागाव फाटा चौकात आले असता पुणे कडून बेंगळूर कडे जाणाऱ्या ट्रेलरची मोटरसायकला पाठीमागुन जोराची धडक बसली. यामुळे हे दोघेजण खाली पडल्याने ट्रेलरचे चाक हर्षदच्या अंगावरून गेले .त्यामुळे हर्षदच्या शरिराचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. तर सुजल हा मोटरसायकलच्या मागे बसल्याने तो धडकेत लांब फेकला गेल्याने जखमी झाला.. ट्रेलर भरधाव असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला होता . हि धडक इतकी जोराची होती की ट्रेलरच्या पुढील भागात मोटरसायकल अडकून शंभर फुट फरपटत नेली या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. अपघातस्थळी शिरोली पोलिसानी धाव घेवून जखमीस व मयतात उत्तरीय तपासणी करता कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले .त्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिसात झाली आहे . पुढील तपास सपोनि पंकज गिरी करत आहेत .