शाहुवाडी प्रतिनिधी
किल्ले विशाळगड ता.शाहूवाडी येथील रियाज दिलावर हवालदार, दिलावर बाबालाल हवालदार व मुमताज दिलावर हवालदार या तिघांना दि.१९ ते २८ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीत शाहूवाडी तालुक्यखतून हद्दपार केल्याचा आदेश शाहूवाडी चे उपविभागीय अधिकारी निखिल खेमणार यांनी दिला आहे.
गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने शाहुवाडी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सीआरपीसी कलम १४४ (२) अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. शाहुवाडी तालुका कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिंबध करण्यात आला आहे. गणेशोत्सव सन शांततेत कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होता. पारंपारिक पद्धतीने साजरा करावा. असे आवाहान सर्व सार्वजनिक गणेश मंडळाना पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी केले आहे.