माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती; शिक्षण विभागाकडे दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण
प्रतिनिधी / कोल्हापूर
कणेरी मठ येथील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली होती . यामध्ये माध्यमिक शिक्षण विभागाकडे दिलेल्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत , अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे , लोकसहभागाबाबत जनजागृती करणे , प्रचार व प्रसिद्धी करणे , पालकांकडून जुन्या साड्या , ताट , वाटी , ग्लास , कडधान्य , डाळ व वेस्टेज प्लास्टिक आदी वस्तू दान स्वरूपात संकलित करणे , तसेच विद्यार्थी व शिक्षक स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणे तसेच कणेरी मठाच्या सुशोभीकरणासाठी कलाशिक्षकांनी सहकार्य करणे आदी जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या . त्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्व संघटनांची एकत्रित सभा घेऊन साहित्य संकलित करण्यासंदर्भात आवाहन केले . तसेच कोल्हापूर जिल्ह्यात माध्यमिक शाळांच्या ९ १ सहविचार मंचाच्या मुख्याध्यापकांची सभा घेऊन साहित्य संकलित करण्याचे नियोजन करण्यात आले . त्यानुसार सहविचार मंचांच्या मुख्याध्यापकांमार्फत साहित्य जमा करण्यात आले . माध्यमिक शाळांतील मुले , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , मुख्याध्यापक तसेच सर्व संघटना पदाधिकारी यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात साहित्य संकलित करून सक्रिय सहभाग दर्शविला आहे . T कणेरी मठामध्ये संकलित केलेल्या साहित्याचा तपशील सहभागी माध्यमिक शाळांची संख्या ७२५ साड्या ५४०२ ९ ताट २७५१८ वाटी २६६२८ ग्लास १ ९ २५६ , मूग ३ ९८३.९ १ किलो , तुरडाळ ५६३० किलो वेस्टेज प्लास्टिक ८५२४ किलो तांदूळ ३६०६.८ किलो , गहू १०२८ किलो , मुगडाळ ४२५ किलो , चादर किंवा ब्लॅकेट ६० आदी साहित्य दान स्वरूपात ग -मस्थांकडून संकलित करून ते श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ कणेरी येथे जमा करण्यात आले आहे . या सक्रिय सहभागाबद्दल सीईओ संजयसिंह चव्हाण तसेच श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे विशेष कौतुक केले आहे .