शिरोळ प्रतिनिधी
घरातील सर्वजण बाहेर गावी गेल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन सात लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन लंपास केल्याची घटना टाकवडे (ता शिरोळ )येथे घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे ही घटना 28 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान घडली.
याबाबत शिरोळ पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी अरुणा मनगु डोंगरे राहणार काटकर मळा टाकवडे (मुळ गाव धनगर गल्ली इचलकरंजी) हे सर्वजण 28 सप्टेंबर रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते अज्ञात चोरट्यांनी डोंगरे यांच्या घराचे लाकडी दरवाज्याचे कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश करून घरात ठेवलेले दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याच्या दोन नग पाटल्या, दोन लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाच्या चार सोन्याचे बिलवर, दोन लाख रुपये किमतीचे चार तोळे वजनाच्या वजनाची मोहन माळ, 25 हजार रुपये किमतीच्या अर्धा तोळे सोन्याची झुबे, 25 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या रिंगा व रोख चार हजार रुपये असा एकूण सात लाख चार हजार रुपये किमतीचा माल चोरट्याने लंपास केला आहे.
फिर्यादी डोंगरे कुटुंबीय एक आक्टोंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घरी आल्यानंतर चोरीची घटना उघड झाली चोरट्याने कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला परंतु दरवाज्याला कुलूप तसेच ठेवल्याने कोणालाही चोरीची घटना समजली नाही टाकवडे येथील काटकर मळ्यात जबरी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीती व्यक्त केली जात आहे सदर घटनेची फिर्याद अरुणा डोंगरे यांनी शिरोळ पोलिसात दिल्या असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे करीत आहेत.