कोल्हापूर/ प्रतिनिधी
वारणा कापशी (ता. शाहूवाडी)येथील करणसिंह राजेंद्र पाटील यांने बी.ए.च्या पदवी परीक्षेत राज्यशास्त्र विभागात शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला.पदवी परीक्षेसाठी असलेली विद्यापीठाची तीन पारितोषिके व शिष्यवृत्ती त्याने प्राप्त केली.
पाटील याने द्वितीय व तृतीय या दोन्ही वर्षाची सलग शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळविली.शिवाय दादा उंडाळकर मेमोरियल प्राईज, हिंमतबहादूर चव्हाण गुरुजी पारितोषिक व प्रोफेसर वासंती रासम पारितोषिक अशी तीन पारितोषिके मिळाली आहेत.श्री.शहाजी छत्रपती कॉलेजचा तो विद्यार्थी आहे.
डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र शासनामार्फत संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन केले होते. शिवाजी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून करणसिंह याची सदर अभ्यास वर्गासाठी निवड झाली होती. त्यास प्राचार्य डॉ.आर.के .शानेदिवाण, प्रा.डॉ.राहुल मांडणीकर ,प्रा. डॉ. विजय देठे यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या फुलेवाडी कोल्हापूर येथे स्थायिक झालेल्या पाटील याचे या यशाबद्दल कौतुक होत आहे.