लम्पीग्रस्त 233 जनावर मालकांना नुकसान भरपाई
कोल्हापूर प्रतिनिधी
कोरोना आणि मंकीपॉक्सनंतर आणखी एक संसर्गजन्य आजार देशातील जनावारांमध्ये सध्या झपाट्य़ाने पसरत आहे. प्रथमदर्शनी या आजाराचा प्रभाव कमी झाला असे वाटत असले तरी जनावारांच्या स्थलांतरामुळे वाढण्याचा पुन्हा धोका निर्माण झाला असून जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी गोठय़ांमध्ये आवश्यक ती औषध फवारणी करावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ग्रामपंचायत विभागाला दिल्या आहेत.
चव्हाण म्हणाले, लम्पी स्किन आजार नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र सर्वांनीच याची काळजी घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिह्यात 358 जनावरे या रोगाला बळी पडली असून त्यापैकी 233 जनावरांच्या मालकांना भरपाई देण्यात आली आहे. तर अजून 125 जनावरांच्या मालकांना भरपाई देण्यात येणार आहे. गायीसाठी 30 हजार, बैलासाठी 25 हजार तर वासरांसाठी 16 हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली असून आता प्रत्येक गोठय़ांमध्ये औषधांची फवारणी होणे आवश्यक आहे. ज्यामुळे या रोगाचा प्रादूर्भाव होणार नाही.
कारखाना परिसरात लसीकरण
जिह्यातील साखर कारखाने सुरू झाले असून उस वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणात बैलांची आवक झाली आहे. परजिह्यातून तसेच परराज्यातूनही बैल आणले आहेत. त्यामुळे स्थलांतर होताना आवश्यक असणारे लसीकरण झालेले न नसल्याचे निदर्शनास आले आहे. कारखान्यांना यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागानेही लसीकरणाला सुरवात केली असल्याची माहिती सीईओ चव्हाण यांनी दिली.