कानून वार्ताहर
गेल्या 24 तासात कानूर विभागात मुसळधार पावसाने जोर धरल्यामुळे फाटकवाडी प्रकल्प अंतर्गत येणारे कोल्हापूर टाईपचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. पिळणी बंधाऱ्यावर दोन फुटावर पाणी आहे तर भोगोली बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या तील वाहतूक बिजूर मार्गे चालू आहे.
गेल्या 24 तासात या विभागात मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरीवर सरी येत असून आज दुपारनंतरच घटप्रभा नदी पात्राबाहेर येण्यास सुरुवात झाली. तर साधारण 5 वाजण्याच्या सुमारास दरम्यान पीळणी बंधारा आणि भोगोली बंधारा पाण्याखाली गेले. मागील 12 तासापासून 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत 5557 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सांडव्यातून 5580.804 क्यूसेस पाण्याचा विसर्ग चालू असून भोगोली पिळणी पूर्णतः पाण्याखाली गेले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास हिंडगाव बंधारा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.