बेळगाव: बेळगाव – धारवाड दरम्यान कर्नाटक राज्य परिवाहनच्या बसमधील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असलेला एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर वायरल होताच, त्याची त्वरित दखल वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाने घेतली आहे. बिघाड झालेल्या बसला वाहतूक सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाड झालेली बस जनसेवेसाठी उपयोगात आणल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.
Add A Comment