ऑनलाईन टीम/तरुण भारत
कुडाळच्या मोर्चामध्ये आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav)यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांना कुडाळ पोलिसांनी (Kudal Police) नोटीस बजावली आहे. दरम्यान, भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Cabinet Minister Narayan Rane) यांच्याबद्दल अवमानास्पद, शिवराळ आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांना नोटीस पाठवली आहे.
जिल्ह्यातील कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्यं केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस आली आहे. याप्रकरणी भाजपनं तक्रार दाखल केली होती. यानंतर भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकेसंदर्भातील नोटीस बजावली आहे. भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपमानकारक आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले होते भास्कर जाधव-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संपत्ती संदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. या विरोधात महाविकास आघाडीनं कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चाच्या सभेत गुहागरचे आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल जनमानसात बदनामी अब्रूनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक, चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कुडाळ पोलिसांनी अटकेसंदर्भातील भास्कर जाधव यांना नोटीस बजावली आहे.