वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स (फ्लोरिडा)
शनिवारी येथे झालेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या खुल्या मियामी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद झेक प्रजासत्ताकच्या बाराव्या मानांकित पेत्रा क्विटोव्हाने पटकावले. क्विटोव्हाने अंतिम लढतीत सातव्या मानांकित इलेना रिबेकिनाचा पराभव केला.
33 वर्षीय क्विटोव्हाने रिबेकिनाचा 7-6(14-12), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 2018 नंतर क्विटोव्हाचे डब्ल्यूटीए टूरवरील हे पहिले तर वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील 30 वे विजेतेपद आहे. 2018 साली क्विटोव्हाने शेवटची स्पर्धा जिंकली होती. क्विटोव्हाला या जेतेपदाबरोबरच 1.26 दशलक्ष डॉलर्सचे पहिले बक्षीसही मिळाले. या स्पर्धेत पुरुष विभागात इटलीचा सिनेर व मेदव्हेदेव यांच्यात जेतेपदासाठी लढत होत आहे.