क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हणुमान चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात केएलएसने सेंट मेरिज संघाचा 9 गड्यांनी पराभव करुन सुपर लीगमध्ये प्रवेश केला. तर केव्हीटुने मराठा मंडळचा 7 गड्यांनी पराभव केला. सुरेंद्र पाटील (केएलएस), पवन तलवार (केव्हीटु) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात सेंट मेरिज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 116 धावा केल्या. त्यात मोहम्मद अफनालने 5 चौकारांसह 27, रिहान नदाफने 21, द्रुव गुज्जरने 16 तर सिद्धेश सुतारने 11 धावा केल्या. केएलएसतर्फे सिद्धार्थ रायकरने 2 तर सोहम पाटील व सुजल पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसने 17.3 षटकात 1 गडी बाद 119 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात सुरेंद्र पाटीलने नाबाद 3 चौकारांसह 45 तर वेदांत दुधाणेने नाबाद 3 चौकारांसह 36 धावा केल्या. सेंट मेरिजतर्फे मोहिद अफनादने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात मराठा मंडळने प्रथम फलंदाजी करताना 19.2 षटकात सर्व गडी बाद 95 धावा केल्या. त्यात मयांक पाटीलने 14 तर अवनिश जाधवने 10 धावा केल्या. केव्हीटुतर्फे पवन तलवारने 4, क्रीश खत्राजने 2 तर यश व कार्तिक एन. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
शनिवारचे सामने : महिला विद्यालय वि. सेंट झेवियर्स स. 9 वा., मराठा मंडळ वि. केएलई दु. 12.30 वा.