मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची असणार प्रमुख उपस्थिती, दहीहंडीचा थरार दाखवण्यासाठी शहरात 12 ठिकाणी उभारणार क्रीन
कोल्हापूर प्रतिनिधी
धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भारतीय जनपा पक्ष यांच्या वतीने गुरूवार 7 सप्टेंबर रोजी साजरा होत असलेल्या गोपाळकालानिमित्त ऐतिहासिक दसरा चौकात युवाशक्ती दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. दुपारी 4 वाजल्यापासून दहीहंडी फोडण्याच्या थराराला सुऊवात होईल. जे गोविंदा पथक उंच दहीहंडी फोडेल, त्याला 3 लाख रूपयांचे बक्षिस मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच व सर्वात जास्ती बक्षीस देणाऱ्या या दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेत्या पंकजा मुंडे व माजी आमदार महादेवराव महाडिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
पहा VIDEO >>>> युवाशक्तीची दहीहंडी 7 सप्टेंबर रोजी
महाडिक म्हणाले, शासनाने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार तयार केलेल्या सर्व नियमांवर आधारीत युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेचे दसरा चौकात आयोजन केले जाईल. यामध्ये पहिल्या प्रयत्नात 7 थरांचा मनोरा उभा करेल त्याला 15 हजार ऊपये, 6 थर उभारणाऱ्या पथकाला 10 हजार ऊपये व 5 थर उभारणाऱ्या पथकाला 5 हजार ऊपयांचे बक्षीस दिले जाईल. प्रत्यक्ष 35 ते 40 फुट उभारल्या जाणाऱ्या मनोऱ्यावर उभा राहून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाच्या जीवाच्या सुरक्षितेचा गांभिर्याने विचार कऊन विशेष उपाय योजना केली आहे. समीट अॅडव्हेंचर्सचे विनोद कांबोज आणि हिल रायडर अॅडव्हेंचर्स फाऊंडेशनचे प्रमोद पाटील यांनी ही उपाय योजना तयार केली आहे. यदाकदाचित एखादा गोविंदा जखमी झाल्यास तातडीने उपचारास नेण्यासाठी सीपीआर, सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका डॉक्टरांच्या पथकासह दसरा चौकात सज्ज असणार आहेत.
महाडिक म्हणाले, की दहीहंडी फोडणारा गोविंदा हा 14 वर्षावरील असावा, असा नियम केला आहे. त्याचे प्रत्येक गोविंदा पथकाला पालन करावेच लागेल. दहीहंडी फोडण्याच्या सोहळ्यात रंगत यावी यासाठी स्वराज्य ढोलताशा पथक आणि सार्थक क्रिएशनकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था उभी केली जाणार आहे. निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठही उभारले जाणार आहे. महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. दहीहंडीस्थळी अनुचित प्रकार घडू नये. तसेच दहीहंडी सोहळ्याला शिस्त लावण्यासाठी युवाशक्तीचे दीडशे कार्यकर्ते सक्रीय राहणार आहेत, असेही महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पृथ्वीराज महाडिक, विनोद कांबोज, विजय टिपुगडे, सागर बगाडे, राजेंद्र बनसोडे व उत्तम पाटील उपस्थित होते.
मोबाईलधारक, छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धा…
मिडीयातील छायाचित्रकारांसाठी युवाशक्ती दहीहंडी फोटो स्पर्धेचे आयोजन केले जाईल. यात पहिल्या तीन उत्कृष्ट फोटोंची निवड कऊन संबंधीत छायाचित्रकारांना अनुक्रमे 10 हजार, 7 हजार व 5 हजार ऊपयांचे बक्षीस देऊन गौरवले जाईल. तसेच समाजातील तऊण-तऊणींसाठी मोबाईल रिल्स दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये जे 3 मोबाईलधारक 3 उत्कृष्ट रिल्स बनवतील, त्यांनाही अनुक्रमे 10 हजार, 7 हजार व 5 हजार ऊपयांचे बक्षीस मिळणार आहे, असे महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.