वृत्तसंस्था/ जर्काता
येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन याचे पुरुष एकेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले.
शुक्रवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या आशिया स्पर्धेतील विजेत्या जोनातन ख्रिस्टीने लक्ष्य सेनचा 15-21, 21-10, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. गेल्या आठवडय़ात झालेल्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला दुसऱया फेरीपर्यंत मजल मारता आली होती.