वृत्तसंस्था/ कोलंबो
झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेसाठी लंका संघाने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असून या संघात काही अनपेक्षित खेळाडूंना संधी मिळाली आहे तर अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला डच्चू देण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळलेल्या व ज्युनियर मलिंगा असे मानल्या जाणाऱ्या मथीशा पथिरानाला या संघात स्थान मिळाले आहे. अलीकडेच अफगाणविरुद्ध झालेल्या मालिकेत त्याने वनडे पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त या संघात 29 वर्षीय दुशान हेमंतालाही स्थान मिळाले आहे. अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला मात्र या संघातून वगळण्यात आले आहे. 18 जूनपासून ही स्पर्धा सुरू होत असून त्यात दहा संघांचा सहभाग आहे. यातील दोन संघ भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणार आहेत.
लंकन संघ : दसुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, चरित असालंका, धनंजय डिसिल्वा, सदीरा समरविक्रमा, हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुश्मंता चमीरा, कसुन रजिथा, लाहिरु कुमारा, थीक्षणा, पथिराना, दुशान हेमंता.