आयईडी अन् काडतुसे हस्तगत
वृत्तसंस्था/ श्रीनगर
उत्तर काश्मीरच्या बारामुल्लामध्ये पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका स्थानिक दहशतवाद्याला जेरबंद पेले आहे. या दहशतवाद्यांकडून एक आयईडी, पिस्तुल, मॅगजीन आणि 18 काडतुसांसह 8 मीटरची तारही हस्तगत करण्यातत आली आहे. तर अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इसहाक लोण असल्याचे समोर आले आहे. तो नादिहाल पांजलाचा रहिवासी आहे.
मोहम्मद इसहाकला एका विशेष माहितीच्या आधारावर सोपोरला लागून असलेलय चकलू गावात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आयईडी हस्तगत करण्यात आले आहे. हा आयईडी सोपोर-बारामुल्ला मार्गावर पेरण्याचा निर्देश त्याला पाकिस्तानातील हँडलर्सनी दिला होता. मोहम्मद इसहाकची सध्या कसून चौकशी केली जात आहे.