कोल्हापूर/ प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँक मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यामध्ये विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीने सुरुवातीपासूनच मताधिक्य घेत आघाडी मिळवली आहे .करवीर तालुका सर्वसाधारण गटातून विरोधी स्वाभिमानी आघाडीचे एस.व्ही.पाटील यांनी 696 मताधिक्य घेऊन विजय संपादन केला. तर हातकणंगले तालुका सर्वसाधारण गटातून राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचे अर्जुन पाटील 1020 मताधिक्याने विजयी झाले. तर पन्हाळा तालुका सर्वसाधारण गटातून राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीचे अमर वरुटे 609 मताधिक्याने विजयी झाले. सर्वसाधारण गटातील अन्य तालुक्यासह 5 राखीव जागांमध्ये हाच ट्रेंड राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी वरुटे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.