स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालिंदर पाटील यांचे आवाहन
भोगावती/प्रतिनिधी
भोगावती साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत एकमेकांवर पारंपरिक आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा “भोगावती” ला कशाप्रकारे वाचविता येईल.याबाबतची ठोस उपाययोजना घेऊन सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी सभेत विचार विनिमय करावेत.त्याबाबत सत्ताधारी मंडळींनीही सभा जास्तीत जास्त वेळ चालवून सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन करून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.जालंदर पाटील यांनी अजूनही भोगावती साखर कारखाना वाचविता येतो असा विश्वास व्यक्त केला.
शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची ६७ वी वार्षिक सभा उद्या शनिवारी भोगावती कारखाना कार्यस्थळावर होणार आहे.त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री पाटील बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.पाटील यांनी सांगितले की,भोगावती सद्या अर्थिक अडचणीत आहे,त्यामुळे दारात येऊन बसलेला खासगी व्यापारी कधीही कारखान्यात प्रवेश करू शकतो.म्हणून आपला साखर कारखाना वाचविण्याची गरज आहे.कारखान्याच्या सत्तास्थानावर आजपर्यंत आलटून पालटून सर्वांनी काम केले आहे.कारखान्याच्या डबघाईला कमी जास्त प्रमाणात सर्वजण जबाबदार आहेत.
दरवर्षीच्या वार्षिक सभेत सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांच्या कारभाराची उणीधुणी काढण्यापेक्षा अन्य काहीही सुचना मांडलेल्या नाहीत.केवळ एकमेकांवर टिका टिप्पणी करून कारखान्याची परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी हा विषय गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.त्यासाठी प्रत्येकाने किमान एकतरी उपाय सभेत सुचवावा.यावर्षी केवळ आरोप प्रत्यारोप करण्याला फाटा देऊन एक नवीन इतिहास घडवूया.गतवर्षी तर स्वाभिमानिचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांना सभेत बोलू दिले नाही हे बरोबर नाही.खरोखरीच भोगावती साखर कारखाना वाचविण्याच्यादृष्टीने सकारात्मक चर्चा होणे महत्त्वाचे आहे.त्यानुसार सत्ताधारी मंडळीसह सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी नवनवीन उपाय सुचवावेत.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले की,कारखान्याचा वार्षिक सभेचा अहवाल चुकीचाच आहे. मागील सुमारे आठ कोटीची ऊसबिलाची देणी व ६२ महिन्याची सभासद साखर देण्याची मागणी करत कारखान्यातील विविध कारभारावर टीका केली.पत्रकार परिषदेला करवीर तालुकाध्यक्ष विलास पाटील, आण्णाप्पा चौगले, रमाकांत तोडकर, रावसाहेब डोंगळे, साताप्पा पाटील, मारुती पाटील, भिमराव गोनुगडे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.पत्रकार परिषदेला करवीर तालुकाध्यक्ष विलास पाटील, आण्णाप्पा चौगले, रमाकांत तोडकर, रावसाहेब डोंगळे, साताप्पा पाटील, मारुती पाटील, भिमराव गोनुगडे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.