मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे आश्वासन
प्रतिनिधी / पणजी
पुढील एका वर्षात पणजी शहराचे 100 टक्के अक्षय ऊर्जा शहरामध्ये रूपांतर करण्याची सरकारची योजना आहे आणि हे आव्हान आम्ही एका वर्षात पूर्ण करून पणजीला 100 टक्के अक्षय ऊर्जा बनवू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
सोलर ऊफटॉप सिस्टीमवरील आयोजित केलेल्या सोलार सिटी कार्यशाळेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते. ते म्हणाले, पणजीचा वीज भार 128 मेगा वॅट इतका आहे. शहराचा सरासरी पीक भार 22 मेगा वॅट आहे जो रीसिटीमध्ये बदलण्यासाठी अक्षय उर्जेच्या मदतीने पूर्ण करावा लागेल. पणजीतील सरकारी आणि खाजगी इमारतींवर बसवलेली सौर क्षमता 0.5 मेगावॅट आहे, असेही ते म्हणाले. शहरातील सर्व सरकारी इमारतींवर सोलर बसविण्यात येणार असून, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्याची पूर्ण माहिती दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील विजेच्या समस्येवर उपाय काढण्यास सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.