नेस्ले- मॅगीच्या नावाखाली गोवा बनावटीची दारूची तस्करी आज उघडकिस आली आहे. कराडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली असून या कारवाईत 60 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.
पहा Video>>>>> सातारा-कराडमध्ये महसूलची कारवाई
कराडमध्ये गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याप्रमाणे विभागाने सापळा रचून या मार्गावरिल वाहनांची तपासणी केली असता एका ट्रकमध्ये नेसले कंपनीच्या बिले आढळून आली. आधिकाऱ्यांचा संशय बळावल्यावर अधिक चौकशी केली असता या पाकिटांमधून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले
पंचनाम्यानंतर ट्रक आणि त्यातील दारू असा 60 लाखआंचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभाग आणि सातारा भरारी पथकाकडून संयुक्तपणे करण्यात आली.