वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दास बुधवारी आजारपणामुळे संपूर्ण आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडला असून यजमान श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. दास विषाणूजन्य तापातून निवळू शकलेला नाही. त्यामुळे तो श्रीलंकेत गेलेला नाही. बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) दासच्या जागी 30 वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज अनामुल हक बिजॉयची निवड केली आहे.