ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडट्टेवार केली आहे. वडेट्टीवार यांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.
वडेट्टीवार यांनी एक्सवर यासंदर्भात पोस्ट करत पत्र शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी. राज्याच्या इतिहासातील मोठय़ा राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1705416686067937396?s=20
लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे. संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.