पणजी : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे येत्या 15 जून रोजी गोवा दौऱ्यावर येत असून ते काणकोण येथे ‘श्रमधाम’ योजनेतील 20 घरांचे लाभार्थींना वितरण करणार आहेत. घरे नसलेल्या त्या 20 लाभार्थींच्या जीवनावर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशनही बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. भाजपा कार्यकर्ते, सदस्य यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. काणकोणचे आमदार व गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्या प्रयत्नातून ‘श्रमधाम’ योजना साकारली असून बेघरांना घरे देण्याचे काम त्या योजनेतून करण्यात येत आहे. कोणकोण येथे तो कार्यक्रम घेणार असून त्यासाठी बिर्ला येणार आहेत.
Previous Articleसोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी तीन बांगलादेशी महिलांना अटक
Next Article जी-20 बैठकीचा फलदायी समारोप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.