जयपूर
श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले आहे. कालवी हे दीर्घकाळापासून आजारी होती. जून 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आल्यापासून ते रुग्णालयात दाखल होते. लोकेंद्र सिंह यांच्यावर नागौर जिल्हय़ातील कालवी या मूळ गावी त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कालवी यांच्या निधनांतर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. सतीश पूनिया यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. करणी सेनेने राजपूर समाजावर आधारित चित्रपट, मालिकांना तीव्र विरोध केला होता.