वृत्तसंस्था/ काठमांडू
19 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने भूतानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
काठमांडूच्या दशरथ स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 20 व्या मिनिटाला जिग्मी नेमगयालने भूतानचे खाते उघडले. त्यानंतर भारतातर्फे जी. गोयरी आणि रिकी मेताई यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून भूतानाचे आव्हान संपुष्टात आणले.
या सामन्यापूर्वी ब गटातील झालेल्या यापूर्वीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 3-0 अशा गोलफरकाने पराभव केला होता. तर दुसऱ्या एका सामन्यात भूतानने बांगलादेशवर 4-3 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळवला असल्याने भारताला ब गटातून आघाडीचे स्थान मिळवण्यासाठी भूतान बरोबरचा सामना अनिर्णित राखला असता तरी चालले असते पण भारताने भूतानबरोबरच्या सामन्यात विजय नोंदवून आपल्या गटात आघाडीच्या स्थानासह उपांत्य फेरी गाठली आहे. ब गटातील भारताचा बुधवारी सामना अ गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या आणि यजमान नेपाळ यांच्यात होणार आहे.
सोमवारी झालेल्या नेपाळ बरोबरच्या सामन्यात पहिल्या 20 मिनिटातच नेपाळने आपले खाते नेमगयालच्या गोलवर उघडले. मध्यंतराला केवळ काही मिनिटे बाकी असताना भारताच्या गोयरीने गोल नोंदवून भारताला 1-1 असे बरोबरीत मध्यंतरावेळी राखले होते. भारताचा दुसरा आणि निर्णायक गोल निकी मेताईने नोंदवून भूतानचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत भारतीय युवा फुटबॉल संघाने अ गटातून सहा गुणासह आघाडीचे स्थान मिळवले आहे.