वृत्तसंस्था/ पॅरिस
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील नेपल्स खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीच्या लोरेन्झो मुसेटीने एकेरीचे अजिंक्मयपद पटकाविले. एटीपी टूरवरील मुसेटोचे हे दुसरे विजेतेपद आहे.
रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुसेटीने आपल्याच देशाच्या मॅटो बेरेटेनीचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव केला. गेल्या जुलैमध्ये मुसेटीने हॅम्बुर्ग येथे झालेल्या क्ले कोर्टवरील टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. पुरुष टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत 20 वषीय मुसेटी 24 व्या स्थानावर आहे.