वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील लॉटरी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱया सांतियागो मार्टिन आणि इतर आरोपींची 173.48 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मार्टिनवर भादंवि अनुच्छेद 120(ब) अंतर्गत कटकारस्थान केल्याचा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. त्याच्यावर अनुच्छेद 201 तसेच विदेशी चलन नियंत्रण कायद्याच्या अनुच्छेद 35 प्रमाणेही आरोप आहेत.
ईडीने मार्टिनविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई चालविली आहे. मार्टिनची कंपनी एम. जे. असोसिएट्सचा आणखी एक भागीदार एन. जयमुरुगन यालाही बेकायदेशीर व्यवहारातून मोठा लाभ झाल्याचे तपासात दिसून आले. त्यांच्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे सरकारला 900 कोटी रुपयांचा फटका बसल्याचे अनुमान व्यक्त होत आहे. मनी लाँड्रिंगचाही आरोपही करण्यात येत आहे.