नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित
‘लस्ट स्टोरीज’ अखेर परतणार आहे. अत्यंत नव्या कहाण्या अन् नव्या कलाकारांसोबत हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर यांच्यासह अनेक कलाकार दिसून येणार आहेत. ‘लस्ट स्टोरीज 2’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. लस्ट स्टोरीज चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाली होती. यात चार दिग्दर्शकांकडून कहाण्या सादर करण्यात आल्या होत्या. अनुराग कश्यप, जोया अख्तर, दिवाकर बॅनर्जी आणि करण जौहरने याचे दिग्दर्शन केले होते. यात राधिका आपटे, भूमी पेडणेकर, मनीषा कोइराला, कियारा अडवाणी, आकाश ठोसर, विक्की कौशल, नेहा धूपिया समवेत अनेक कलाकार दिसून आले होते. ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्येही चार दिग्दर्शकांनी कहाणी दर्शविली असून यात अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकणा सेन शर्मा, आर. बाल्की, सुजॉय घोष यांचा समावेश आहे. तर कलाकारांमध्ये अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय शर्मा सामील आहे. ‘लस्ट स्टोरीज 2’ नेटफ्लिक्सवर 29 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.