प्रतिनिधी / येळ्ळूर : मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी जि. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठी पत्रकांसाठी हे आंदोलन होणार असल्याने मोठया संख्येने या आंदोनात भाग घेण्याचा निर्धार येळ्ळूर वासियांनी केला आहे. श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये रविवारी रात्री येळ्ळूर विभाग म. ए. समिती येथे बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी हे होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थित आमचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. मराठीत परिपत्रके मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने हा लढा लढण्यात येत आहे. त्यामुळे या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणयेकर, शिवाजी सुंठकर ग्रामपंचायत उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, संतोष मंडलिक, प्रकाश मरगाळे, दत्ता उघाडे, विलास घाडी यांनी विचार केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश मेणसे, दयानंद उगाडे, शिवाजी नांदुरकर, माजी ता. पंचायत सदस्य चांगदेव परीट, शिवाजी पाटील, महेश जोगेकर, शिवाजी कदम, जोतिबा चौगुले, राकेश परीट, उदय जाधव, वामन पाटील, शहापूरकर, वाय सी इंगळे, मधु पाटील परशुराम घाडी, मनीषा घाडी, शालन पाटील, वनिता परीट आदी मान्यवर उपस्थित होते.