वृत्तसंस्था~ नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 39 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. दिमानी प्रदेशातून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उमेदवारी देण्यात आली. तर राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-1 मधून उमेदवारी दिली आहे. तसेच निवास मतदारसंघातून केंद्रीय मंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांना, खासदार राकेश सिंह जबलपूर पश्चिममधून, केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल नरसिंगपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपच्या ताज्या यादीत महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. डबरा मतदारसंघातून इमरती देवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच रीती पाठक यांना सिधी, ज्योती दाहेरिया परसिया, गंगाबाई उईके घोंडाडोगरी, नंदा ब्राह्मणे यांना भिकणगाव मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. तसेच संगीता चरेल या सैलाणा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मध्यप्रदेशमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारपुढे निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेत येण्याचे आव्हान आहे.