क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
खेलो इंडिया पश्चिम विभाग महिला लीग ज्युडो स्पर्धेतील कालचा दिवस मध्यप्रदेशच्या ज्युडोपटूंनी गाजवला. कांपाल येथील इनडोअरमध्ये झालेल्या या स्पर्धेत सीनियर गटात मध्यप्रदेशने 7 पैकी 3 सुवर्णपदके जिंकली.
मध्यप्रदेशच्या हिमांशी टकासने 63 किलोखालील, महिमा पाठकने 70 किलोखालील तर अमिशा कडे हिने 78 किलोखालील वजनीगटात सुवर्णपदक मिळविली. महाराष्ट्राच्या केतकी गोरेने 52 किलोखालील तर शांभवी कदमने 78 किलोवरील वजनीगटात सुवर्णपदके प्राप्त केली. राजस्थानच्या मोनिका चौधरीने 48 किलोखालील वजनीगटात तर गुजरातच्या शाहीन दोजाडाने 57 किलोखालील वजनीगटात सुवर्णपदके मिळविली.
गोव्याने या स्पर्धेतील प्रत्येकी दिवशी पदक मिळविले होता. काल त्याच्या फैझा अत्तार पदक मिळविण्यात थोडक्यात चुकली. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मध्यप्रदेशला काल 3 सुवर्ण व एक रौप्य, महाराष्ट्राला 2 सुवर्ण, एक रौप्य व चार ब्राँझपदके, राजस्थानला एक सुवर्ण व प्रत्येकी 3 रौप्य व कास्यपदके तर गुजरातला एक सुवर्ण, दोन रौप्य व सहा कास्यपदके मिळाली. या स्पर्धेत एकूण 650 ज्युडोपटूंनी भाग घेतला होता.