बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या हस्ते महांतेशनगर येथील सरकारी शाळेत नव्याने बांधलेल्या स्मार्ट क्लासरूम्सचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी ते म्हणाले कि, स्मार्ट क्लासरूमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि उपकरणे वापरण्यासाठी तयार आहेत. बेळगावमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि शिक्षणाचे स्तर उंचावण्यासाठी शाळांच्या विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे. मुलांना उत्तम पायाभूत सुविधा मिळायला हव्यात आणि सर्व सरकारी शाळांमध्ये याची खात्री करून घेण्यात येईल. आपल्या मतदारसंघात लवकरच या सुविधा उपलब्ध होतील.