Sushma Andhare : महाराष्ट्र भूषण पुरस्कारा दरम्यान उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला.या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान आज ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. आज त्या कोल्हापुरात बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, अप्पासाहेबांनी साधेपणाने कार्यक्रम करावा आशा सूचना केल्या असतील मात्र त्यांनी दिलेली वेळ घेतली म्हणत त्यांच्याबद्दल भाजप चुकीची माहिती देत आहे.मृतांचा आकडा लपवला गेला आहे. 100 हुन अधिक मृत झाले असावेत. 16 कोटी खर्च करता तर अजून थोडे पैसे खर्च करून पेंडाल का उभे केले नाही. आरोग्य विभागाला अगदी शेवटच्या वेळी कार्यक्रमाची कल्पना दिली गेली. स्वतंत्र रुग्णवाहिकेचा मार्ग केला नाही. अनुयायांना मतदार समजून मतावर डोळा ठेवत कार्यक्रम घेतला गेला असा आरोपसुषमा अंधारे यांनी केला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शिंदे-फडणवीस यांनी खेळ केला. भाजपचा कोणताही नेता या लोकांपर्यंत पोहचला नाही.अमित शहा यांनीही मतांचे राजकारण केले.अमित शहा मृत लोकांपर्यंत पोहचले नाहीत एवढे सुद्धा त्यांनी पाळले नाहीत. मुख्यमंत्री या घटनेला जबाबदार आहेत, त्यांना कोणत्याही गोष्टीचा राजकीय इव्हेंट केल्याशिवाय जमत नाही.पाच लाख देऊन हात झटकून चालणार नाही.सर्वसामान्य लोकांचे सरकार म्हणता आणि पाच लाख देऊन हात झटकता. उष्माघात नव्हे तर सुविधा अभावानेही लोक मृत झाले आहेत. हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक असाल तर या पापाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही अंधारे यांनी केली.
अजित पवार यांच्याविषयी बोलताना अंधारे म्हणाल्य़ा की, अजित पवारांनी काल भूमिका स्पष्ट केली आहे.यानिमित्ताने शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत.त्यांची घडामोडीवर स्टेटमेंट पाहता शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात. महाविकास आघाडी अभेद्य आहे,आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत. अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे.वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजपकडून हे केले जात आहे.फडणवीस यांचे मौन सगळे सांगून जाते की स्क्रिप्ट रायटर हे फडणवीस आहेत. पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणे थांबणार नाही.मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment