विधानसभेत बहुमत चाचणी आज पार पडली. १६४ मतांसह शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकले. तर यात महाविकास आघाडीचा पराभव झाला. शिंदे-भाजप सरकारला १६४ मते तर मविआला ९९ मतं मिळाली. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर सभागृहाची सर्व दरवाजे १० मिनिटे बंद करण्यात आली. यामुळे अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांना मतदान करता आले नाही. बहुमत सिध्द होताचं सत्ताधारी आणि विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. यावेळी टीका- टीपण्णी करत असताना सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अजितदादांनी भाजपावर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेतला. दरम्यान भास्कर जाधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर सुधीर मुनगंटीवर यांनी महाभारताचे दाखले देत उरलेल्या आमदारांचे मतदार संघ वाचवा असा इशाराही दिला.
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड काल झाली. अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. आज शिंदे- फडणवीस बहुमत चाचणी होणार आहे. शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. हा विश्वासदर्शक ठराव आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. आज शिंदे विजयाचे चिन्ह दाखवत विधानसभेत दाखल झाले. कालच्या विजयानंतर शिंदे सरकारची दुसरी कसोटी आज विधानसभेत लागणार आहे. याचे सारे अपडेट जाणून घ्या.(Maharashtra Floor Test LIVE Update)
-विधानसभेचे कामकाज सुरु करण्यापूर्वी विधानभवनाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. दरवाजे बंद करत असतानाच आदित्य ठाकरे विधानभवनात पोहचले. त्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले.
विनय कोरेंकडून शिंदे- फडणवीसांचे कौतुक
सामान्यांच्या समस्या माहित असणारे शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.
लोकशाहीचा महाराष्ट्रात विजय झाला.
सामान्य कुटुंबातील व्यक्ती आज राज्याचा मुख्यमंत्री.
शिंदे- फडणवीसांचे कौतुक.
सामान्यांच्या हितासाठी सरकार काम करेलं.
सुधीर मुनगंटीवारांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र
तुमच्यातील काही आमदार आता माजी आमदार होणार.
उरलेल्या आमदारांचे मतदारसंघ टिकवून दाखवा असा इशाराही त्यांनी दिला.
अजितदादांनीही आमच्या सोबत शपथ घेतली होती.
शिवसेनेनं भगवा सोडला.
काॅंग्रेस बरोबर युती करणार नाही असे बाळासाहेब म्हणाले होते. बाळासाहेबांचा तोच शब्द उध्दव ठाकरेंनी मोडला.
बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांना तुम्ही मंत्रीपदं दिले.
अडीच वर्षात मंत्र्यालयामध्ये नोटा छपाईचा कारखाना सुरु होता.
काही लोकांनी रावणाची भूमिका घेतली होती.
आमदारांना वराहं असं म्हटलं गेलं. विष्णूनींही वराहाचा अवतार घेतला होता, हे विसरू नका.
हिंदुत्वाच्या विचारासाठी एकत्र आले.
आज शिंदे राज्याच्या विकासाचे खरे पालनकर्ते.
पक्षांतर करणारी तुमची यादी वाचू का…? असा सवाल त्यांनी केला.
महाभारताची भाषा करणारे तुम्ही कौरव आहात, भास्कर जाधवांवर हल्लाबोल.
बहुमताचं सरकारं येताचं यांचं रडगाण सुरु झालं.
एक दिवस सत्तेशिवायं राहू शकत नाही.
अभिनंदनाच्या कार्यक्रमात मविआनं रडण्याचा कार्यक्रम सुरु केलं.
NCP-काॅंग्रेसची सरकार चालवण्याची पात्रता नसल्याचे जनतेनं दाखवून दिलं.
विश्वास दाखवणाऱ्या आमदारांचे आभार मानले.
दुष्टांचा संहार करण्याची ताकद मुख्यमंत्र्यांना मिळू दे.
भास्कर जाधवांचा शिंदे गटावर हल्लाबोल
शिवसेना विरुध्द शिवसेना लढवण्याच प्रयत्न केला जात आहे.
कोण कोणावर घाव घालणार.
भास्कर जाधवांच्या भाषणावेळी सभागृहात गोंधळाचे वातावरणं
एकवेळ पक्षाने घरी बसवायला पाहिजे होतं पण असी विटंबना नको.
भास्कर जाधवांच्या ईडीच्या मुद्यांवर सरनाईकांचा आक्षेप.
नियती कशी फिरते याचं हे उदाहरण.
ज्यांच्या मागे ईडी लावली त्य़ांचे मागे आता केंद्राची सुरक्षा देणार.
सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या दिवसापासून मविआ सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न केलातं.
आमदार तुमच्या सोबत गेलेत मात्र शिवसैनिक सेना वाचवण्यासाठी खंबीर आहे.
बाळासाहेबांच, दिघेंचं नाव घेतायं तुमच्यावर मोठी जबाबदारी.
शिंदे म्हणतात, मी आजही शिवसैनिक आहे.
गेले ८ दिवस मी विचलित आणि अस्वस्थ आहे.
विरोधकांचा आवाज सरकारने एेकूण घेतला पाहिजे.
शिंदे आणि फडणवीसांचे अभिनंदन.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले,
राज्यातील पीक -पाण्यावर पहिली बैठक घ्या असा सल्ला ही यावेळी त्यांनी दिला.
महाराष्ट्रात दुबार पेरणीचं संकट.
राज्यात दुष्काळ असताना आमदार गुवाहीटीत होते.
सत्तेचा आनंद असतो पण जबाबदीरी असते हे विसरु नका असा सल्ला त्यांनी दिला.
एक पक्षाचं सरकार असतानाही कुरबुरी असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार होतं.
कोविड काळात महाराष्ट्रातील कामाचं जगभरात कौतुक करण्यात आलं.
चक्रीवादळातही मविआ सरकारनं भक्कम काम केलं
कोविडच्या काळात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगलं काम केलं.
सेनेत्या पुढाकारानं मविआ सरकार स्थापनं झालं. सरकार स्थापन होताचं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली.
फडणवीस साहेब तुमचं कामचं तुम्हाला अडचणीत आणतंय.
मी येणार, मी येणार म्हणत होता, पण तुम्ही येणारं हे माहित होतं पण असे यालं अस वाटलं नव्हतं. फडणवीसांना टोला
एकनाथ शिंदेंचा प्रवास अभूतपूर्व आहे.
अजितदादा पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
नगरविकास खात्याला १२ हजार कोटी दिले. निधी मिळत नव्हता हा शिंदे गटाचा आरोप खोटा आहे असा आरोप त्यांनी केला.
१०६ वाला सीएम होत नाही, ४० वाला सीएम होतो काय काहीतरी काळंबेरं
सुरतला जाण्यापूर्वी सत्तार २ तास अगोदर माझ्याशी सत्तार बोलले. जाताना आम्हाला सांगितलं नाही.
फुटणाऱ्या शिवसेना नेत्याबरोबर शिवसेना जात नाहीत, हा इतिहास आहे.
मोठी लोक कधी एकत्र येतील तुम्हाला कळणार नाही, तुम्ही मागे राहालं.
काय़ झाडी, काय डोंगार, काय हाॅटेल शहाजीराव जरा सांभाळून … शहाजी पाटलांवर अजित पवारांची टोलेबाजी.
सेनेसोबत बंडखोरी करणारे आमदार पुन्हा कधीही निवडून आले नाहीत.
राज्यपाल आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
शिंदेंमध्ये पात्रता होती तर २०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये एकच खातं का दिलं गेलं? असा सवाल त्यांनी फडणवीसंना विचारला.
अडीच वर्षात फडणवीस सीएम, विरोधीपक्षनेते,उपमुख्यमंत्री अशी सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली.
फडणवीस नशिबवान आहेत अडीच वर्षात तीन पदं भूषवली.
फडणवीसांचा जोश आता पहिल्यासारखा दिसत नाही. अजित पवारांचा फडणवीसांना टोला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य़ांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
माझं मुंबईत घरं नाही, अन्यथा ते ही तोडलं असतं.
मी पुन्हा आलो आणि शिंदेंना बरोबर घेऊन आलो.
हनुमान चालिसा म्हटल्यानं घरं तोडली, तुरुंगात टाकलं.
एका महिला आमदाराला १५ दिवस तुरुंगात डांबल.
सत्ता निरंकुश होते तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो.
…म्हणूनच अनेक लोक फुटून आमच्याकडे आले.
‘एकनाथ आणि देवेंद्र म्हणजे ईडी…’
शिंदे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदे हे दिघेंसारखेचं सर्वसामान्यांसाठी काम करतात.
विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज मविआ काळात दाबला गेला.
एकनाथ शिंदे २४ तास काम करणारा नेता आहे.
आरोग्य खातं, MSRDC मिळाल्यानंतरही शिंदेंनी चांगल काम केलं.
समृध्दी महामार्गामध्ये शिंदेंचं मोठं यागदान आहे.
शाखाप्रमुख ते मुख्य़मंत्री असा त्यांचा प्रवास आहे.म
शिंदेंचे पंख छाटण्याचे काम अनेकवेळा करण्यात आले.
ज्या व्यक्तींमध्ये कतृत्व असतं त्याला पद महत्त्वाचं नसतं.
अदृश्य ज्या हातांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे फडणवीसांनी मनापासून आभार मानले.
शिंदेंची कर्मावर अढळ निष्ठा आहे.
शिंदेवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा प्रभाव आहे.
एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक आहेत.
शिवसेना-भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन फडणवीसांनी केलं.
मतविभागणीचा निकाल जाहीर
प्रस्तावाच्या बाजूने १६४ मतं तर विरोधात ९९ मतं मिळाल्याने शिंदे-भाजप सरकार बहुमतांनी जिंकल असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केला.
महाविकास आघाडीच्या मतदानाला सुरुवात
समाजवादी पक्षाचे आमदार तटस्थ.
महाविकास आघाडीचे मतदान पूर्ण
एकूण ९९ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
शिंदे-भाजपाचे मतदान सुरु
-कामकाज सुरु होताच उभे राहून आणि अनुक्रमांक सांगत शिंदे -भाजपच्या बहुमत चाचणीला सुरुवात झाली.
-अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार मतदानाला मुकले.
-आमदार शहाजी भोसले यांच्या मतदानावेळी काय ती झाडीची घोषणाबाजी करण्यात आली.त्याचबरोबर प्रताप सरनाईक, संतोष बांगर यांच्या मतदानावेळीही घोषणाबाजी करण्यात आली. प्रताप सरनाईक यांच्या मतदानावेळी ‘ईडी-ईडी’ ची घोषणाबाजी करण्यात आली.
-भाजप -शिंदे गटाचे मतदान पूर्ण. १६४ आमदारांनी केलं मतदान.
-१६४ मतांसह शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकल.
Previous Articleलाडफे गावातील धबधबा पर्यटनासाठी बंद
Next Article कळसा भंडुरा प्रकरणी लक्ष घालून त्वरित कृती करा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment