मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार : आयोजन समितीची माहिती
डिचोली/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी डिचोली मतदारसंघातर्फे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांचा शनि. दि. 16 जुलै रोजी संध्या. 4 वा. डिचोलीतील हिराबाई झांटय़े स्मृती सभागृहात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सत्कार समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजन समिती अध्यक्ष तथा माजी सभापती राजेश पाटणेकर, मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, तुळशीदास परब, अर्जुन माळगावकर, यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गोवा विधानसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांनी डिचोलीचे प्रभारी म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. आज त्यांची महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपला आनंद असून त्यांचा सत्कार आयोजित करण्याचे निश्चित केल्याचे राजेश पाटणेकर यांनी सांगितले.
या सत्कार सोहळय़ास प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सन्माननीय अतिथी म्हणून राज्य विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट व इतरांची उपस्थिती लाभणार असल्याचे सांगिण्यात आले.
या सत्कार सोहळय़ाच्या यशस्वी आयोजनासाठी सत्कार आयोजन समितीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी रजेश पाटणेकर यांची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण समिती पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष – राजेश पाटणेकर, उपाध्यक्ष – कुंदन फळारी, तुळशीदास परब, सागर शेटय़े, बाळा देसाई, वल्लभ साळकर, श्रुती घाटवळ, अर्जुन गावकर, चंदन परब, प्रकाश राऊत, तुळशीदास गावकर, संजय म्हापसेकर, अजित बिर्जे आणि सुखदा तेली. सचिव – विश्वास गावकर. सदस्य – नितीन सामंत, शर्मिला पळ, अजिंक्मय नेवगी, संक्रीता देसाई, सिया बिर्जे, कमलेश तेली, श्यामू नाईक, कविता नाईक, बाबलो गावकर, चंद्रा परब, किशोर नाईक, शेखर परवार, मोहन राऊत, गोपी राऊत, उमेश मळीक, कुंदा च्यारी, अंकुश गाड, आनंद वजरीकर, संगम पळ, समीर वायांगणकर, दिलीप खरबे आणि रमेश कळंगुटकर. निधी समिती – डॉ. शेखर साळकर, विजयकुमार नाटेकर, निलेश टोपले, सुदन गोवेकर, अभिजीत तेली, डॉ. कौस्तुभ पाटणेकर आणि अनिकेत चणेकर. स्वागत समिती – अरुण नाईक, विठ्ठल वेर्णेकर, श्याम मातोणकर, महादेव तिरोडकर, अर्जुन माळगावकर आणि ऍड. रंजना वायंगणकर. देखरेख समिती – विश्वास गावस, ऋषिकेश खडपकर, रुपेश गायकवाड, बाबू चननकर, वसंत गाड, रामा नाईक आणि दीपा पळ.