Maharashtra SSC Result 2023 : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली. उद्या दुपारी एक वाजता निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत यंदाची दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. या परीक्षेसाठी 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.